राहुल परदेशी कंपन्यांचे लॉबिस्ट रवीशंकर प्रसाद यांचा आरोप; राहुलची कागदपत्रे खोटी


नवीदिल्लीः राफेल प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एअरबस कंपनीचा इमेल सादर करून अनिल अंबानी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी 10 दिवसांत राफेल व्यवहारावर स्वाक्षरी होईल, असा गौप्यस्फोट केला. त्यावर केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी राहुल यांच्यावर पलटवार केला आहे. राहुल यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी आहेत. राफेल प्रकरणी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले आरोप लज्जास्पद आणि बेजबाबदारपणाचे आहेत, अशी टीका त्यांनी केली.

राहुल हे विमाने पुरविणार्‍या कंपन्यांचे लॉबिस्ट म्हणून काम पाहात आहेत, असा आरोप प्रसाद यांनी केला आहे. त्यांना एअरबसचा इमेल कुठे मिळाला? राहुल यांनी एअरबस कंपनीचा जो इमेल सादर केला; तो राफेल संबंधित नसून अन्य कोणत्यातरी हेलिकॉप्टर व्यवहाराशी संबंधित आहे, असा दावा त्यांनी केला आहे. एअरबस या कंपनीबरोबर काँग्रेस सरकारच्या काळात झालेले व्यवहार संशयास्पद आहेत. आम्ही राहुल यांचा खोटेपणा जनतेसमोर आणू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

राहुल यांनी राफेल प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन एक नवा इमेल सादर केला आहे. या इमेलमध्ये एअरबस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी लिहितात, की अनिल अंबानी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांना भेटले आहेत आणि त्यांनी 10 दिवसात राफेल व्यवहारावर स्वाक्षरी होईल, असे सांगितले आहे. या इमेलवरुन जी माहिती समोर आली आहे, त्यावरून मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही राहुल यांनी केली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget