Breaking News

विनायकशेठ काळे यांचा काळेवाडीत करिष्मा कायम


डिस्कळ, (प्रतिनिधी) : काळेवाडी (ता. खटाव) ग्रामपंचायतीत माजी सरपंच विनायकशेठ बाबूराव काळे यांनी आपला करिष्मा कायम ठेवत सरपंचपदाला दुसर्‍यांदा गवसणी घातली. त्यांना 132 मते मिळाली.

 त्यांचे प्रतिस्पर्धी विजय काळे यांना 81 मतांवर समाधान मानावे लागले. छबुताई प्रल्हाद काळे (42), ऋतुजा संतोष काळे (43), विजय काळे (47), निर्मला दत्तात्रय काळे (47), ज्ञानदेव राजाराम काळे (48) हे विजयी झाले. सलग तीन टर्म सत्ता राखत विनायकशेठनी हॅटट्रीक साधण्याबरोबर राष्ट्रवादीची प्रतिष्ठाही कायम ठेवली आहे.