Breaking News

श्रीपतराव महाविद्यालयाचे गोपूजला श्रमसंस्कार शिबिरऔंध (प्रतिनिधी) : येथील राजा श्रीपतराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर गोपूज (ता. खटाव) येथे होणार असून बुधवार, दि. 13 रोजी सकाळी अकरा वाजता शिबीराचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य डॉ श्रीकांत भंडारे यांनी दिली.

या श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन बुधवारी औंध शिक्षण मंडळाच्या चेअरमन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते व प्रांत दादासाहेब कांबळे, माजी महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख, आलम मुजावर, रणजित फडतरे, सरपंच उषा जाधव, औंध शिक्षण मंडळाचे विश्‍वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या शिबिरात विद्यार्थी जलसंवर्धन आणि वृक्षसंवर्धन यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत, विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सोमवार, दि. 18 रोजी सकाळी या शिबिराचा समारोप होणार असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रम अधिकारी प्रा. आयुब मुल्ला, प्रा. पी. एन. शिंदे यांनी केले आहे.