Breaking News

ग्रामीण भागातील शाळा या शहरी भागा सारख्या होत आहेत -चंद्रकांत शेजुळ; उमरी जिल्हा परिषद शाळेला तिन लाखांचा निधी


माजलगाव : प्रतिनिधी
सांस्कृतिक कार्यक्रम हे फक्त महाविद्यालय किंवा शहरातील इंग्लिश स्कूल मध्ये होतात गेल्या तिन ते चार वर्षांपासून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागल्याने आता ग्रामीण भागातील शाळा सुध्दा सांस्कृतिक कार्यक्रम घेत शहरी भागा सारख्या होत आहेत आसे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत शेजुळ सोमवार रोजी तालुक्यातील उमरी जिल्हा परिषद शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम च्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी गटशिक्षणाधिकारी महामुनी, केंद्र प्रमुख एम.एस.वाघमारे, विजया बँक उपाध्यक्षआसाराम घायतिडक, ग्रामशेवक एस.एम.चव्हाण, संचालक आसाराम घायतिडक, मथुरादास घायतिडक, मुख्याध्यापक अंकुश डाके, शिक्षकनेते रमेश फपाळ शालेय पोषण आहार प्रमुख पाठक व पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना शेजुळ म्हणाले की,ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत गावकरी लोकवर्गणी करून शाळा डिजिटल करत आहेत. आता गावातील नागरिक शाळेकडे विशेष लक्ष देत आहेत.

शाळेसाठी गावकर्‍यांनी राजकारणाचे जोडे बाहेर ठेवावे. शाळेत राजकारण करू नये. गावाची शाळा कसी प्रगती करेल यावर लक्ष ठेवावे जिल्हा परिषद फंडातुन शाळेसाठी तिन लाख रुपये चा निधी देणार आसल्याची ही घोषणा चंद्रकांत शेजुळ यांनी केली. सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये विद्यार्थ्यांनी आनेक हिंदी, मराठी, कोळी गितावर डान्स सादर केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे भले बी.पी., जोशी ए.बी, संतोष गिरे, बडे मँडम, डांगे लहुदास, एस.एस.पवार, डी.ए रोडेवाड, वाय. के.शेख या शिक्षकांनी सहकार्य केले. या कार्यक्रमा साठी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन सह विद्यार्थी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.