Breaking News

देवळा येथे विद्यार्थ्यांनी भरवली आनंदनगरी


अंबाजोगाई : प्रतिनिधी
विध्यार्थीच्या कला गुणांना वाव मिळावा व्यापार पद्धती माहिती होऊन नफा तोटा कळवा मुलाच्या बौद्धिक व सर्वांगिण विकासासाठी या उपक्रमाचे आयोजन देवळा येथे करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळा व शालेय समिती आणि श्रमकरी ग्रुपच्यावतीने येथील मैदानात आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकांनी व गावकर्‍यांनी भरभरून प्रतिसाद दिला विद्यार्थी अतिशय सुंदर, चविष्ट,उत्कृष्ट पदार्थ तयार करून आणले होते. सद्या दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुलांनी अत्यंत अल्प दरात दहा ,पाच, रुपय फुल प्लेट उपलब्ध करून दिले होते एक दिवसाच्या तयारीत अत्यंत कमी वेळेत सुंदर नियोजन शिक्षक आणि शिक्षिका , विद्यार्थी यांनी केले होते. यामध्ये पहिली ते सातवी पर्यत च्या विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे उदघाटन वत्सलाताई यादव सरपंच यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष योगिनी खामकर, सुलतानबी शेख, ग्रामपंचायत सदस्य पार्वती जाधव, महादेव यशवंत, प्रभाकर सगट, नानासाहेब शेळके अशोक खामकर, भाऊसाहेब खामकर, रवींद्र देवरवाडे, महेश शितोळे, श्रीकृष्ण शितोळे, संजय बचाटे, नाना यादव, गणेश जाधव आणि शिक्षक शिक्षिका, पालक यांनी परिश्रम घेतले.