Breaking News

तासाभरात मोबाईल चोर गजाआड


राहुरी/प्रतिनिधी :राहुरी बस स्थानकाजवळून महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावून पळणारा भांमटा एक तासात पोलिसांनी गजाआड करत मोबाईल महिलेस परत मिळाल्याने पोलिस प्रशासनाचे शिवाजी खरात व महेद्र गुंजाळ यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या बाबत हकीगत अशी की, सुनंदा सदाशिव दहातोंडे ह्या राहुरी नगरपरिषद येथे प्रकल्प अधिकारी म्हणून नोकरी करतात. दि.27 रोजी चांदे ता. नेवासे येथून माका ते राहुरी बसने राहुरी बस स्टॅन्ड येथे सकाळी उतरुन राहुरी नगरपालिकेकडे निघाल्या असता हॉटेल योगेश समोरुन जात असताना एक अनोळखी इसम आला व त्याने त्याच्या हातातील सॅमसंग कंपनीचा -7 मॉडेलचा मोबाईल हिसकावून धक्का देवून तेथुन निघुन गेला , सदर अनोळखी इसमाचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षांचे होते. अशी फिर्याद दाखल करताच कर्तव दक्ष पोलिस शिवाजी खरात व महेंद्र गुंजाळ यांनी तात्काळ सायबर टीमच्या फुरकान शेख यांच्याशी संपर्क साधत मोबाइलचे लोकेशन घेतले.

 ते बस स्थानकावरील एका हॉटेलचे आल्याने तात्काळ पोलिस खरात व गुंजाळ यांनी फिर्यादीला सोबत घेत त्या ठिकाणी आरोपीची ओळख पटताच त्याला ताब्यात घेतले. व त्याची झडती घेतली असता त्याच्या कडे फिर्यादी दहातोंडे यांचा मोबाइल मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून आरोपी हा शिलेगाव येथील असल्याचे सांगतोय व दारूच्या नशेत आपण हे कृत्य केल्याचे कबूल करतोय तरी या आरोपी कडून आणखीन बरच गुन्हे उघड होण्याची श्याक्यात असल्याचे बोलले जाते. या सर्व प्रकरणाचा तपास जलद गतीने लावल्याने पोलिस शिवाजी खरात व महेद्र गुंजाळ यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.