Breaking News

कॉ.काकडेंनी ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणली - भापकर


चापडगाव/प्रतिनिधी  :कॉ.आबासाहेब काकडे व स्व.निर्मलाताई काकडे या काकडे दाम्पत्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची कास धरून ग्रामीण भागात राहणार्‍या तळागाळातील दलित, भटके-विमुक्ता बरोबरच बहुजन वर्गाला शिक्षणाचे धडे मिळावेत म्हणून, ज्ञानाची गंगा आणून शिक्षणाच जाळ पसरवण्याचा प्रयत्न केला असून, प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेतल्यास तो निश्‍चितपणे यशस्वी होईल, असे मत क्रीडा व युवक सेवा पुणे विभागाचे आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केले आहे.

 शेवगाव तालुक्यातील कांबी येथील एफ.डी.एल शिक्षण संस्थेच्या कांबी हायस्कूलची स्थापना होऊन 50 वर्ष पूर्ण झाले. या शाळेचा सुवर्ण महोत्सव व सुवर्णक्षण स्मरणिका प्रकाशन सोहळा पार पडले. नंतर आयोजित कार्यक्रमात डॉ.भापकर अध्यक्ष पदावरून बोलत होते. 
  
यावेळी बोलताना डॉ.भापकर म्हणाले की, शिक्षण ही काळाची गरज हा उद्देश व दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून कॉ.आबासाहेब काकडे यांनी त्या काळी ग्रामीण भागात आपल्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण संस्था उभारल्या असल्याने त्याचा मोठा फायदा ग्रामीण भागाला झाला आहे. मी ही काही काळ याच संस्थेत शिक्षक म्हणून काम केले आहे. हे काम करत असताना मी माझ्या मनामध्ये पुढील शिक्षणाचा संकल्प केला होता. तो मी अभ्यास करून पूर्ण केला असल्यानेच इथपर्यत पोहचलो आहे. असे सांगून, या शाळेच्या क्रीडांगणासाठी 7 लाख रुपयाचे अनुदान जाहीर करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही भूमी माझ्यासाठी तपभूमी ठरली असून, या संस्थेमुळेच मला पुढची वाट सापडली आहे. असे सांगून विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात आपणास आवडत असेल तोच शिक्षणाचा मार्ग अवलंबला पाहिजे असेही म्हटले आहे.
  या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, ज्ञानेश्‍वर खुरंगे, सरपंच सविताताई म्हस्के, उपसरपंच योगेश कुर्‍हे, माजी सरपंच पंजाबराव पारनेरे, सुरेश दुसंगे, अ‍ॅड.विजय भेरे संस्थेचे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शिवनाथ देवढे, डॉ.अरुण भिसे यांचेसह संस्थेचे वेगवेगळ्या ठिकाणचे सर्व आजी माजी शिक्षक, विद्यार्थी, पालक व अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.