Breaking News

हाडाचा ठिसूळपणा व कॅल्शियम तपासणीचे शिबीर डॉ.विवेक दंडे यांच्या पारिजात क्लिनिक मध्ये संपन्न

परळी : प्रतिनिधी
डॉ.विवेक दंडे यांच्या पारिजात क्लीनिक येथे हाडाचा ठिसूळपणा व कॅल्शियम तपासणीचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन सौ. भरतीताई, दत्तात्रय कुलकर्णी व सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजन कँडीला कंपनीमार्फत करण्यात आले होते.

त्याचे नियोजन कंपनीचे एम.आर. मुजम्मिल खान व किरण देशमुख यांनी केले. या शिबिरासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी तपासणी शिबिरासाठी १५० ते २०० लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात दत्तात्रय कुलकर्णी, हेमंत कुलकर्णी, सौ.शीला कुलकर्णी श्रीनिवास देशमुख तसेच भाजप चे कामगार नेते हमीदभाई गुत्तेदार, फरकंद बेग आदी परिसरातील नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. सर्व रुग्णांना, ज्यांना काही त्रास होता त्यांना डॉ.विवेक दंडे साहेबांनी योग्य पद्धतीने उपचार केले व संतुलितआहार विषयक सल्ला दिला व आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान केले. शिबिरासाठी गणेश लाड, सुनील वैद्य, अभिषेक शेटे यांनीं सहकार्य केले.