Breaking News

राज्य शासनाचा ४०% हिस्याचे प्रेरकांचे मानधन लवकरात लवकर द्याआष्टी (प्रतिनिधी) :- दि.०७/०२/२०१९ अंतरिम आदेश केला.सविस्तर माहिती अशी आहे कि,साक्षर भारत अंतर्गत काम केलेल्या प्रेरकांचे ४५ महिन्याचे मानधन अदा न केल्याने भाऊसाहेब खोड,गणेश काळे,शेख रज्जाक, जयश्री चिपाडे, सुनिता सरवदे, सतिश जायभाये,सचिन देवडे, सवासे, गणेश शिंदे,यशवंत पवार, बाबासाहेब ससाणे,फिरोज पठाण यासह इतर प्रेरक यांनी २०१८ मध्ये मा.उच्च न्यायालयांमध्ये याचिका क्र.६५३३/२०१८ दाखल केली होती.सदर याचिकेमध्ये दि.७/२/२०१९च्या सुनावणी दरम्यान राज्य शासनाने (याचिकाकर्ते) यांचे एकूण मानधनाच्या ४०% मानधन हे लवकरात लवकर देण्याचे आदेशित केले.व त्याच बरोबर केंद्र शासनाच्या ६०% बाबत त्यांचे म्हणणे मांडण्या बाबत ४ आठवड्याचा वेळ देण्यात आला.तसेच शिक्षण अधिकारी(निरंतर) बीड यांचं मा.उच्च न्यायालयाने नैसर्गिक न्याय तत्वानुसार नोटीस काढायचे आदेश मा.न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला व मा.न्यायमूर्ती ए.ढवळे यांनी आदेश दिले व पुढील सुनावणी ४ आठवडयांनी ठेवली. याचिका कर्त्यातर्फे ऍड. अविनाश आघाव, केंद्र सरकार तर्फे ऍड. रवी बांगर व राज्य शासनातर्फे ऍड. गणाचार्य यांनी काम पाहिले.