Breaking News

शिवप्रतिष्ठानच्यावतीने चौधरवाडी शाळेस वॉटर फिल्टर, वॉटरकुलर भेटवाघोली, प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा चौधरवाडी ता. कोरेगाव येथील शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्र्रम नुकताच पार पडला.

या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी व श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मंडळ चौधरवाडी अध्यक्ष वैभव गजानन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंडळातील सर्व सभासदांनी एकत्र येऊन जि.प. शाळेतील मुलांना शुद्व पाणी पिण्यासाठी मिळावे याहेतुने शाळेसाठी एक वॉटर फिल्टर आणि एक वॉटरकुलर भेट दिला. या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या मुलांनी व मुलीनीं विविध कलागुण सादर करून पालक शिक्षक व ग्रामस्थांची मन ेजिंकली. या कार्यक्रमामध्येअंगणवाडीच्या नवीन ईमारतीचे उदघाटन जि.प.सदस्य मंगेश धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कोरेगाव मार्केट कमिटीचे संचालक बाळसाहेब भोईटे शिवनेरी बँकेचे संस्थापक तानाजीराव शिंदे, चौधरवाडी गावच्या प्रथम नागरीक सौ.सुषमा गोसावी उप सरपंच दत्तात्रय शिंदे, वाघोली पंचक्रोशीतील जि.प.शाळेचे शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सर्व आजी, माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.