Breaking News

गुणवंत साहित्यिक पुरस्कार शिवराम होके यांना जाहीर

माजलगाव (प्रतिनिधी )- येथील प्रसिद्ध साहित्यिक शिवराम होके याना यावर्षीचा साप्ताहिक माजलगाव परिसर च्या वतीने दिला जाणारा कैलास वासी देविदासराव कुलकर्णी स्मृती गुणवंत साहित्यिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे साप्ताहिक माजलगाव परिसर च्या वतीने दरवर्षी साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट लेखन करणार्‍या महाराष्ट्रातील एका व्यक्तीस संपादक प्रदीप कुलकर्णी यांचे वडिलांचे वडिलांचे स्मृतिप्रीत्यर्थ गुणवंत साहित्यिक पुरस्कार दिला जातो यावर्षी या पुरस्कारासाठी कवी शिवराम रुस्तुमराव होके पाटील यांना जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण साप्ताहिक माजलगाव परिसर च्या वर्धापन दिन कार्यक्रमात दिनांक ४ मार्च २०१९ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती संपादक प्रदीप कुलकर्णी यांनी दिली