शिवसेनेच्या दणक्याने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला न्यायपुसेगाव (प्रतिनिधी) : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत पास देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी करूनही वडूज, कोरेगाव, दहिवडी आगारांकडून काहीही अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. शिवसेना कोरेगाव विधानसभा मतदासर संघाचे नेते तथा उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव आणि शिवसैनिकांनी वडूज आगारात आंदोलनाचे हात्यार उगारताच एसटी प्रशासनाच जाग आली आणि प्रलंबीत प्रश्‍नाला न्याय मिळाला. आंदोलनावेळी सेनेचे खटाव तालुकाप्रमुख दिनेश देवकर, महिपती डांगरे, कोरेगाव तालुकाप्रमुख सचिन झांझुर्णे, सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, कोरेगाव शहरप्रमुख अक्षय बर्गे, जोतिराम गवळी, सूरज जाधव, कट्टर शिवसैनिक सचिन गवळी, पुसेगाव शहरप्रमुख आकाश जाधव यांच्यांसह शिवसैनिक आणि विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रताप जाधव म्हणाले, परिवहनमंत्री रावते यांनी दुष्काळी जनतेला आधार म्हणून विद्यार्थिनींना मोफत पास योजना जाहीर केली. जेणेकरून दुष्काळाच्या झळा सोसणार्या कुटूंबाला तेवढाचआधार होईल परंतू याचे यंत्रणेला गांभीर्य दिसत नाही वरचेवर माहिती घेतली असता समाधानकारक उत्तर मिळत नाही वडूज डेपोमध्ये विचारणा केली असता तहसील कार्यालयाकडून गावाची माहिती मिळत नसल्याने हा विषय लांबणीवर पडला आहे, असे सांगण्यात आले. या बाबत परिवहनमंत्री रावतेंकडे या विभागाची तक्रार करणार आहे मंत्री महोदयांनी आदेश देऊन सुद्धा सातारा परिवहन विभाग झोपला आहे होता का? आदेश देऊन एक महिना झाला तरी गांभीर्य का नाही? आता अंत पाहू नका, दोन दिवसात मोफत पास द्या, अन्यथा शिवसेने स्टाईल आंदोलनाला सामोरे जा असा इशारा प्रताप जाधव यांनी दिला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget