नागलवाडी ग्रामस्थांचे उपोषण लेखी आश्‍वासनानंतर मागे


कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथील ग्रामपंचायत सदस्याला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, या व इतर मागण्यांसाठी दोन दिवसांपासून नागलवाडी ग्रामस्थांचे उपोषण सुरू होते. अधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत बंधार्‍याचे काम सुरू होते. या कामाची तक्रार केली म्हणून बुधवारी माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य कैलास कापरे यांना माहिजळगाव येथे मारहाण केली होती. तसेच या बंधार्‍याच्या कामाची चौकशी करावी, या मागणीसाठी नागलवाडी येथील नागेश्‍वराच्या मंदिरासमोर सरपंच, उपसरपंच व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपोषणला सोमवार पासून बसले होते. मंगळवार पाचच्या सुमारास संबंधित आधिकार्‍यांनी पांडुरंग गायसमुद्रे आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी, विठ्ठल वाबळे, गुलाब शेख, उपोषणकर्त्याची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर आपल्या मागण्या संदर्भात उपस्थित अधिकार्‍यांनी, झालेल्या कामाची गुणवत्ता चाचणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करू, झालेले कामे तसेच ठेऊन जवळच नव्याने बंधार्‍याच्या सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget