बसस्थानक भागातील रिक्षाचालकांना आवर घाला


अहमदनगर/प्रतिनिधी : “शहरातील बसस्थानक परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून त्यांना पोलीस प्रशासनाने तातडीने आवर घालावा’’, अशी मागणी राष्ट्रवादी महिला व युवक आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

याबाबत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, लता गायकवाड, निर्मला जाधव, भारती भोसले, नंदा भोसले, वैशाली गुंड, प्रीती संचेती, अपर्णा पालवे, योगेश गलांडे, आकाश दंडवते, सागर गुंजाळ, नितीन लिगडे, दीपक खेडकर, गोटू व्यवहारे, ऋषी ताठे, विशाल मांडे यांच्या शिष्टमंडळाने गृह विभागाचे पोलीस उप अधीक्षक अरुण जगताप यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यामध्ये म्हटले आहे की, “शहरामध्ये विशेषतः माळीवाडा बसस्थानक परिसरामध्ये रिक्षा व पॅगो रिक्षाचालकांनी उच्छाद मांडलेला असून बसस्थानकांमधून येणार्‍या नागरिकांना आपल्याच रिक्षामध्ये बसवण्यासाठी त्यांच्यामध्ये चढाओढ लागलेली असते व त्यामुळे रस्त्यातच या रिक्षांचा ठिय्या मांडलेला असतो, त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना या परिसरातून जाणेही जिकिरीचे झाले आहे. त्यातच सर्वसामान्य नागरिकांना या रिक्षाचालकांच्या दंडेलशाहीचा सामना करावा लागतो व वेळप्रसंगी मारही खावा लागतो.’’
शहर वाहतूक विभागाचा या सर्व गोष्टींकडे हेतुपुरस्कार कानाडोळा असून बाकीच्याच गोष्टींकडे लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचप्रमाणे जुने स्वस्तिक चौक व सध्याचे राज पॅलेस चौक ते एलआयसी ऑफिस या रोडवर सध्या अनधिकृत वाहनांनी आपली पार्किंग चालू केलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बरेचशे अवैध धंदे चालू झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांना तो रस्ता चांगला झालेला असताना सुद्धा त्याचा वापर करता येत नाही. अशीच परिस्थिती शहरतील बर्‍याच भागांमध्ये पाहायला मिळते. याचाच अर्थ शहर वाहतूक विभागाचा गलथान कारभार पाहायला मिळत आहे. तरी या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता लवकरात लवकर कारवाई करून नागरिकांच्या समस्या दूर करण्यात याव्यात अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागेल’’, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget