मुलीच्या लग्नाच्या चिंतेने वडलांची आत्महत्या


जामखेड ता/प्रतिनीधी
जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथील भैरवनाथ राक्षे यांनी मुलीचे लग्न जमवले, व सुपारी फुटली. मात्र, लग्नाचा खर्च कसा करायचा या चिंतेत असलेल्या मुलीच्या वडीलांनी लग्नाची सुपारी फुटली त्याच्या दुसर्‍याच दिवशी विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.

भैरवनाथ नवनाथ राक्षे (वय 46) वर्षे रा.धोंडपारगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भैरवनाथ राक्षे हे शेतीचे लाकडी अवजारे बनवायचा व्यवसाय करत होते. मात्र, अलीकडे दुष्काळ व बदलत्या काळानुसार या व्यवसायात बदल होऊन लोखंडी अवजारे निघाले. त्यामुळे राक्षे यांचा लाकडी अवजारे बनवण्याचा व्यवसाय अडचणीत आला होता. त्यातच मुलीचे लग्न देखील जमले होते. व दोनच दिवसांपूर्वी मुलीच्या लग्नाची सुपारी देखील फुटली होती. तेंव्हापासून ते मुलीच्या लग्नाच्या चिंतेत होते. या नंतर शनिवारी सकाळी ते घरातून कोणालाही न सांगता घराबाहेर पडले. तेंव्हा पासून घरातील लोक त्यांचा शोध घेत होते. दिवसभरात त्यांचा तपास न लागल्याने जामखेड पोलिस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

या नंतर चार दिवसांनी त्यांचा मुतदेह त्यांच्या गावापासूनच जवळ बावी गावच्या शिवारात प्रकाश चोखा साळवे यांच्या शेतातील गट नं.63 मध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच जवळच विषारी औषध प्राशन केलेली बाटली अढळुन आली. या वरुन त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे लक्षात आले. या नंतर धोंडपारगावचे पोलिस पाटील रामचंद्र नामदेव शिंदे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला खबर दिली. व पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी घटनास्थळीच श्‍वविच्छेदन केले. घटनास्थळी सा.पो.नि अवतारसिंग चव्हाण यांनी भेट दिली असून पुुढील तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नान्नज पोलिस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल चव्हाण व कॉ.गहिनीनाथ यादव, पो.कॉ.तागड हे करत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget