Breaking News

बर्‍हाणपूर प्राथमिक शाळेला सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार प्रदान


चांदे/प्रतिनिधी :नेवासे तालुक्यातील बर्‍हाणपुर प्राथमिक शाळेला पुण्यातील प्रयास ग्रुपच्यावतीने करण्यात आलेल्या मुल्यांकनात सर्वात जास्त गुण घेत सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार मिळविला आहे. त्याच्या या यशाबद्दल बर्‍हाणपूर ग्रामस्थांनी शाळेत जाऊन त्यांचा नागरी सत्कार केला.

 पुणे येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिस्टुट सोसायटीच्या प्रयास ग्रुप मंच कार्यरत आहे. त्यानुसार शनिशिंगणापूर येथे मार्गदर्शन शिबीर भरविण्यात आले होते. यामध्ये 14 विद्यालये 19 प्राथमिक शाळा याच्यामधील 9 हजार विद्यार्थ्यानी भाग घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात टिकुन राहता यावे आधुनिक जगाचे ज्ञान मिळावे या हेतूने प्रयास ग्रुप गेली बारा वर्षापासून महाराष्ट्रात काम करत आहे. नेवासे तालुक्याचे शिबीर शनिशिगणापूर येथे संपन्न झाले. त्यात प्रयास ग्रुपने सर्व शाळांचे मुल्यांकन केले. त्यामध्ये विविध भौतिक सुविधा मुलांचे ज्ञान शैक्षणिक बाबी अध्यापनाची पध्दत संगणकीय ज्ञान मुलांची शिक्षकाबाबत सृजनशीलता आदी बाबींचे मुल्यांकन केले.

यामध्ये बर्‍हाणपूर येथील प्राथमिक शाळेला सर्वत्कृष्ट शाळा म्हणून मुल्यांकन मिळाले. सन्मानपत्र चषक देऊन शाळेचा गौरव करण्यात आला. शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल बर्‍हाणपूर ग्रामस्थांच्या वतीने शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्याचा नागरी सत्कार शाळेत जाऊन करण्यात आला. यावेळी आखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव चव्हाण, रामभाऊ चव्हाण, दिपक चव्हाण, कारभारी जाधव, गणपत चव्हाण, मुरलीधर पंडीत, शिक्षक बॅकेचे माजी चेअरमन नितीन काकडे, सोपान बेल्हेकर, आदी उपस्थित होते.