Breaking News

कर्तृत्वाच्या बळावर यशाची पायरी चढणे सोपे : न्या. गंगापूरवाला


अहमदनगर/प्रतिनिधी :  “विधी शिक्षण घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने कायद्याचा तार्किक आणि विश्‍लेषणात्मक अभ्यास करून न्यायालयापुढे प्रभावीपणे मांडता आला पाहिजे. त्याग, प्रामाणिकपणा आणि संयम इ. गुण अंगिकारले तर प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते’’, असे प्रतिपादन न्या. एस. व्ही. गंगापूरवाला यांनी केले.

येथील न्यू लॉ कॉलेज आयोजित कै.एस.बी.म्हसे पाटील द्वितीय राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी न्या.एस.व्ही. गंगापूरवाला बोलत होते. 

अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सचिव जी.डी. खानदेशे होते. यावेळी  रा. ह. दरे, अ‍ॅड. व्ही.डी.आठरे पा., अ‍ॅड. दीपलक्ष्मी म्हसे पा.,  अरुणा काळे,  निर्मिला काटे, जंगले, अ‍ॅड. माणिकराव मोरे, अ‍ॅड. सुभाष भोर, जी. के. पाटील, अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे, अ‍ॅड. एस. टी. शेळके, अ‍ॅड. विठ्ठल वाघ, अ‍ॅड. नारायण नरवडे, प्राचार्य दोडके, अ‍ॅड. निर्मला चौधरी, अ‍ॅड. शहाजी दिवटे, अलका जंगले, निर्मला काटे,  प्रा.व्ही. ई. शिंदे, अ‍ॅड.लगड, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. रामेश्‍वर दुसुंगे, एन.एम. कानवडे, पी.सी.म्हस्के, शरद पुंड, डॉ. पी.जी.धिरवडे, डॉ.बी.डी.पांढरे, डॉ. ए.एल.मोरे, प्रा.जी.ए.हिरडे, प्रा.आर.डी.भवाळ,  प्रा.एस.एम. पाचे, प्रा. मते, प्रा.पूनम वड्डेपल्ली आदींनी परिश्रम घेतले.
प्रारंभी प्राचार्य एम.एम.तांबे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अ‍ॅड.व्ही.डी.आठरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.पी.सी. खुळे यांनी केले तर आभार अ‍ॅड. माधवेश्‍वरी म्हसे यांनी मानले.