Breaking News

किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांची नोंदणी


अहमदनगर/प्रतिनिधी :  जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत 14 तालुक्यातील 1 हजार 601 गावातील 8 अ प्रमाणे 9 लाख 43 हजार 642 खातेदार शेतकर्‍यांची संख्या  असून या योजनेंतर्गत परिशिष्ट 8अ प्रमाणे अनिवार्य माहिती संकलित झालेल्या 1 हजार 601 गावातील पात्र शेतकरी कुटूंबांची संख्या 5 लाख 68 हजार 241 इतकी आहे. त्यापैकी एनआयसी पोर्टलवर 1 हजार 487 गावातील 3 लाख 78 हजार 55 शेतकरी कुटूंबांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.  शेतकर्‍यांची संख्या अपलोड करण्यामध्ये अहमदनगर जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी सांगितले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. नानासाहेब पवार सभागृह येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत राहुरी व नगर तालुक्यातील लाभार्थ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, डॉ. किरण कोकाटे, कृषी उपसंचालक विलास नलगे, डॉ. शरद गडाख आदि उपस्थित होते

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशातील गोरखपूर या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर देशातही याचवेळी सर्व ठिकाणी लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचलन कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी केले. या कार्यक्रमास लाभार्थी  नागरिक  उपस्थित होते.