Breaking News

श्री मार्कंडेय जयंती उत्साहात


अहमदनगर/प्रतिनिधी : येथील श्री मार्कंडेय मंदिरात मार्कंडेय जयंतीनिमित्त गांधी मैदान येथे मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसाद (भंडारा) चे वाटप करण्यात आले. देवस्थानच्या वतीने सकाळी 7 वाजता रुद्राभिषेक, स.8 वा. होमहवन, सकाळी 10 वा. सत्यनारायण महापूजा, स.11 वा.आरती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीसाठी मंडाळाचे अमित सुंकी, अमित गाली, प्रवीण सुंकी, अमोल गुंडू, आकाश अरकल, राजू इगे, मनोहर बोरा, योगेश बोल्ली, देविदास शिरापुरी, राकेश गाली, देविदास गड्डम, प्रशांत बोगा, प्रवीण बोज्जा, संजय नुती, श्रीकांत नुती, राजू म्याना, मनोहर म्याना, अजय लयचेट्टी, विजय कोडम, अनिल अलवाल, रुपेश मुप्पाराम, अंबादास गोटीपामूल आदींनी विशेष परिश्रम घेतले.