वनपालासह दोन वनरक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात


वाई (प्रतिनिधी) : झाडांची वाहतूक करण्यासाठी वनविभागातील दोन वनरक्षकांनी मंथली म्हणून तीन हजारांची मागणी केली व तक्रारदारांकडून वाईतील एका हॉटेलमध्ये ही रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहाथ पकडले. या दोघांनाही लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याप्रकरणी वनपालावरही गुन्हा दाखल झाला आहे.


तक्रारदाराचा निलगीर, बाभूळ व सुबाभूळ यांची झाडे तोडणे व विक्रीचा व्यवसाय आहे. या झाडांची वाहतूक करताना मदत करण्यासाठी भुईंज वनकार्यालयातील संतोष पांडूरंग गलांडे व सोमनाथ सदाशिव निकम या वनरक्षकांनी तक्रारदारांकडे मंथली म्हणून तीन हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी तक्रारदारांकडून वाईतील एका हॉटेलमध्ये ही रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहाथ पकडले. लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याप्रकरणी वनपाल जगदीश रामचंद्र मोहिते यांच्यावरही गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आरीफा मुल्ला यांनी दिली आहे. ही कारवाई पोलिस उप अधिक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget