पत्रकारास मारहाणप्रकरणी आरोपीस अटक


देवळाली प्रवरा/प्रतिनिधी
देवळाली प्रवरा येथील पत्रकार राजेंद्र उंडे यांच्यासह कुंटुंबातील व्यक्तींना मारहाण करणार्‍या 6 आरोपींना अटक करण्यात आली. चार दिवस झाले तरी आरोपींना अटक केली जात नसल्यामुळे राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांना निवेदन देण्यापुर्वीच अटक करुन कारवाई केल्याने पत्रकारांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवार दि. 8 फेब्रुवारी रोजी पत्रकार राजेंद्र उंडे हे बाजारतळ येथून दोन लहान मुलांसह वृत्तपत्र घेवून घरी निघाले असता या आरोपींनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर या कुटुंबाने उंडे यांच्या घरी येवून कुटुंबाला मारहाण या कुटुंबाची गल्लीत कायम दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्या कुटुंबाच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा रजि.नं. 97/2019 नुसार कलम 143,147, 323 , 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी महेश पुंडलीक हुडे, पुंडलीक दत्तात्रय हुडे, गणेश पुंडलीक हुडे, कमल पुडलीक हुडे, रोहीणी महेश हुडे, रविना गणेश हुडे (सर्व रा.देवळाली प्रवरा ता.राहुरी) आदींना पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली. गुन्हा दाखल करुन चार दिवस झाले तरी अटक केली जात नसल्याच्या निषेधार्थ पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांना निवेदन देवून मागणी करणार होते, परंतू पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करुन कारवाई सुरु असल्याचे सांगितले असता पञकारांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी पञकार रियाज देशमुख, विजय भोसले, अनिल कोळसे, शरद पाचारणे, मनोज साळवे, राजेंद्र पवार आदींसह विविध वृत्तपञाचे पञकार उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget