Breaking News

सौरभ पवार युपीएससी परीक्षेत भारतात तिसरा


खंडाळा (प्रतिनिधी) : केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या युपीएससी परीक्षेत सातारा जिल्हयातील खंडाळा बावडा येथील सौरभ शिरीष पवार यांनी उज्वल यश संपादित करीत देशपातळीवरील गुणवत्ता यादीत तिसरा येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत सौरभ पवारने मिळविलेले यश अनेकसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सौरभ पवारने जिद्द व चिकाटी कायम ठेवत खंडाळ्याचा नावलौकिक वाढविला आहे. या यशाबदल बोलताना सौरभ पवार म्हणाले की, सकारात्मकतेेची कास, स्वयं प्रेरणा व ध्येय निश्‍चितीमुळे मला हे यश लाभले. माझ्या यशात शिक्षक व हितचिंतकांचे मोलाची साथ मिळाली. सौरभ पवार हा गौरीशंकर शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रा. मदनराव जगताप यांचा भाचा आहे. त्याच्या उज्वल यशाबदल अ‍ॅड. उज्वल निकम, अनुराधा देशमुख, शिवकृपा पतपेढीचे कृष्णाजी शेलार, अविनाश भोसले यानी अभिनंदन केले.