Breaking News

उच्च शिक्षणामुळे मानवी विचारसरणीत बदल - खैरमोहंमद


अहमदनगर/प्रतिनिधी : “बुद्धीला जागृत करण्याचे काम शिक्षण करते, शिक्षणामुळे मानवी जीवन उत्तम घडत असते व मानवी विचारसरणी बदलत असते, त्यामुळे अवगुण कमी होतात व मानव काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा युवकांनी जास्तीत जास्त वाचन करुन उच्च शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे’’, असे प्रतिपादन छावणी परिषदेच्या महात्मा गांधी उर्दू स्कूलचे मुख्याध्यापक खैरमोहंमद खान यांनी केले.

माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.जाकीर हुसेन यांच्या जयंतीनिमित्त मखदूम सोसायटी व अहमदनगर सोशल फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने महात्मा गांधी उर्दू स्कूल, भिंगार येथे आदरांजली वाहून त्यांच्यासाठी दुवा करण्यात आली. याप्रसंगी शेख अख्तर, सय्यद आसीफ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख अकील, आसीफ अत्तार, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पवार, डॉ. सुनीता चौरे, प्रियंका तांबे, सय्यद शफकत, नईम सरदार, अरविंद कुडिया, शेख अमजद आदी उपस्थित होते.

खैनमोहंमद पुढे म्हणाले, “डॉ.जाकीर हुसेन यांनी शिक्षणाच्या आधारे 1957 साली बिहारचे राज्यपाल झाले व पुढे 1967 साली भारताचे राष्ट्रपती या सर्वोच्चपदी विराजमान झाले यावेळी शेख मुबीना यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन शेख सुमय्या यांनी केले. प्रास्तविक आबीद खान यांनी केले तर आभार शेख मुस्कान व खान नुसरत यांनी मानले.