Breaking News

शिवसेनेच्या माध्यमातून फकीरवाडा येथे विकासकामांना वेग - गाडे


अहमदनगर/प्रतिनिधी : “प्रभागातील तळागाळातील आणि सामान्य लोकांमध्ये राहून शिवसैनिक त्यांचे प्रश्‍न सोडवतात. प्रभाग 4 मधील विविध भागात विकासकामे चालू असून नागरिकांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसह त्यांना मूलभूत सुविधा देण्याच्या दृष्टीने शिवसेनेच्या माध्यमातून फकीरवाडा येथे विकासकामांना वेग आला आहे’’, असे प्रतिपादन नगरसेवक योगीराज गाडे यांनी केले.

प्रभाग 4 मधील फकीरवाडा येथील नागरिकांना उत्कृष्ट दर्जाचा रस्ता मिळण्याच्या हेतूने रस्ता डांबरीकरण कामाची पाहणी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली आणि ठेकेदाराला रस्ता करताना असणारे अडथळे काढून घेऊन पुढील रस्ता करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अशोक शिंदे, ऋषिकेश काकडे, संतोष निंबाळकर, शुभम जाधव, संगम चांदकोटे, गणेश निंबाळकर, संगीता सांगळे, अरफाज शेख, समीर शेख, रजिया शेख, अजर शेख, रियाज सय्यद व परिसरातील नागरिक उपस्थित होते.