खंबाटकी बोगदा प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना न्याय देऊ : खा.शरद पवार


वाई (प्रतिनिधी) : वाई पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप यांनी दिल्ली येथे खा. शरद पवार यांची भेट घेऊन नविन खंबाटकी बोगद्याच्या भूसंपादनाबाबत पवार साहेबांसोबत चर्चा केली. यावेळी वाण्याचीवाडी, खंडाळा, वेळे व इतर गावातील शेतकर्‍यांच्या अडचणी खा. शरद पवार यांना जगताप यांनी सांगितल्या असून खा. पवार यांनी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे.

राष्ट्रीय महामार्गासाठी खंडाळा तालुक्यातील वाण्याचीवाडी, खंडाळा, वेळे गावच्या शेतजमिनींचे नव्या बोगद्यासाठी भूसंपादन करत असताना बरेचजण भूमिहीन, अल्पभूधारक होणार आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. प्रकल्प महत्वाचा आहे त्याचप्रमाणे शेतकर्‍यांचे हित पाहणे महत्वाचे आहे. नवा खांबाटकी बोगदा होणे आवश्यक असले तरी त्यासाठी होणार्‍या भूसंपादनात शेतकर्‍यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. जमिनींचे गुंठ्याला दिलेले दर कमी असल्याने प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. अधिकार्‍यांनी भूसंपादन करताना शेतकर्‍यांबद्दल संवेदनशीलता दाखवावी. महामार्गालगतचा 500 मीटर परिसर धरून प्रतिगुंठा 10 लाख रुपये दर शेतकर्‍यांच्या जमिनीला मिळावा, अशा विविध मागण्या शेतकर्‍यांच्यावतीने अनिल जगताप यांनी खा. शरद पवार यांच्याकडे केल्या आहेत. खा. पवार यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका मांडली असल्याचे जगताप यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या बाजूने उभे राहून प्रकल्प बाधित शेतकर्‍यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget