Breaking News

पाटण राष्ट्रवादी युवकच्या कार्याध्यक्षाचा अपघातात मृत्यू


ढेबेवाडी,  (प्रतिनिधी) : मानेगाव (ता. पाटण) गावच्या हद्दीतीर पुलानजीक कराड - ढेबेवाडी मार्गावर दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अपघातात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पाटण तालुका कार्याध्यक्षाचा जागीच मृत्यू झाला. विशाल सुनील मोरे (वय 25, रा. साईगडे. ता. पाटण) असे मृताचे नाव आहे.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेचे पाटण तालुका कार्याध्यक्ष विशाल मोरे हे कराडहून तळमावलेच्या दिशेने जात होते. विरोधी दिशेने येत असलेली एक बोलेरो कार कराडकडे निघाली होती. त्याचवेळी वळणावर दोन्ही वाहने समोरासमोर आल्यानंतर विशाल मोरे यांच्या बुलेटला बोलेरो कारने समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की बुलेटचे इंजिन तुटले व विशाल मोरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कराड येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

विशाल मोरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी होते. यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसमध्येही त्यांनी काम केले होते. विशाल मोरे यांच्या अपघात ज्या ठिकाणी झाला तेथून केवळ एक किलोमीटर अंतरावर त्याचे घर होते. शनिवारी सकाळी विशाल यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटण तालुक्यातील पाटणकर गटाचा या भागातील एक तरूण व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ते परिचित होते. या अपघाताची नोंद ढेबेवाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.