Breaking News

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांचे नुकसान


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाली आहे. वाराणसीहून नवी दिल्लीकडे जाणार्‍या एका एक्स्प्रेसवर दगडफेक होत होती. त्याचदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस या मार्गावरून जात असताना दगडफेकीचा फटका वंदे भारत एक्स्प्रेसलाही बसला आहे. या दगडफेकीत ड्रायव्हरच्या खिडकीसहित इतर खिडक्यांचेही नुकसान झाले आहे. या दगडफेकीत वंदे भारत एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरच्या खिडकीच्या काचांवर तसेच एक्स्प्रेसच्या बाहेरील बाजूच्या काचांवरही दगडांचे तुकडे लागल्याने यात वंदे भारत एक्स्प्रेसचे नुकसान झाले आहे.