Breaking News

पत्रकारावर झालेल्या हल्याचा जामखेडमध्ये निषेध; तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन


जामखेड ता/प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पत्रकार राजेंद्र उंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या हल्याचा जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकाराच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करून आरोपीना अटक करून कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पत्रकार राजेंद्र उंडे यांच्यासह त्यांची आई व पत्नीस गावातील काही लोकांकडून मारहाण करण्यात आली. राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप आरोपीना अटक करण्यात आली नाही या घटनेची चोकशी करून आरोपीना कठोर कारवाई करण्यात यावी. या निवेदनावर पत्रकार नासिर पठाण, लियाकत शेख, ओंकार दळवी, समीर शेख यासिन शेख, निलेश वनारसे, संजय वारभोग, प्रकाश खंडागळे, फारूक शेख, रिजवान शेख, शिवाजी इकडे, अशोक वीर, दीपक देवमाने यांच्यासह इतर पत्रकाराच्या सह्या आहेत.