Breaking News

कुस्तीची गौरवशाली परंपरा जोपासण्यासाठी कटिबद्ध : पै. माने


औंध (प्रतिनिधी ) : औंध येथील मागील शंभर वर्षाहुन अधिक काळ सुरू असलेली कुस्तीची परंपरा जोपासण्यासाठी यापुढील काळात ही कटिबद्ध राहणार असून यंदाचे कुस्ती मैदान श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडण्यात आल्याची माहिती औंध कुस्ती कमिटीचे अध्यक्ष पै.वसंतराव माने यांनी दिली.

येथील श्रीयमाईदेवी यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या समारोप प्रसंगी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कुस्ती कमिटीचे उपाध्यक्ष पै.सदाशिव इंगळे, संतोष भोसले, वसंतराव जानकर, पै.कुलदीप इंगळे,पै.किसन तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पै.वसंतराव माने म्हणाले,संस्थानकाळापासून औंधच्या कुस्तीला राजाश्रय मिळाला आहे. हाच नावलौकिक पुढे सुरु ठेवण्यासाठी पुढील काही दिवसात औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सुविधा मल्लांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सुसज्ज कुस्ती संकुल उभारण्याचा ही कुस्ती कमिटीचा मानस आहे. परिसरातील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे. यावेळी सदाशिव इंगळे यांनी प्रास्ताविक केले .पै.कुलदीप इंगळे यांनी आभार मानले.