माजलगाव : प्रतिनिधी
सामजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य आणि क्रिडा संचनालाय महा.राज्य पुणे व सत्यशोधक बहू उदेशिय शिक्षण संस्था चांदूर बाजार,अमरावती यांच्या संयुक्त विद्यामाने दिव्याग मुला-मुलीच्या राज्यस्तरीय स्पर्धा दि.१ते ३फेब्रु.दरम्यान अमरावती येथे संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये माजलगाव येथील स्वा.सेनानी सुभाषचंद्र बोस मुक बधिर विद्यालयचा विद्यार्थी बळीराम दलवे याने ५०मी.व्हील चियर रेस या स्पर्धेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
त्या बद्दल रा.कॉ.ता.सरचिटणीस नितीन थोरात यानी बाजार समितीचे सभापती अशोक आबा डक यांच्या हस्ते सत्कारचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना सभापती अशोक डक म्हणले की विद्यार्थ्यानी धेय्य समोर ठेउन धेय्य गाठण्यासाठी प्रयत्न करावे तसेच ’कोशिश करने वालो की कभी हार नाही होती आशा शब्दात कौतुक केले व पुढील वाटचालिस शुभेच्या दिल्या यावेळी बाजार समितीचे संचालक वैजनाथराव जाधव ,अनंतराव सोळ्ंके,संभाजीराव सोळ्ंके,बाबासाहेब आगे,शाळेचे मुख्याध्यापक देवदत्त गायकवाड उपस्थीत होते.
Post a Comment