Breaking News

लोहा-कंधार राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असलेल्या रस्त्यावर पाणी मारण्याचीमागणी


खरवंडी कासार/प्रतिनिधी
लोहा कंधार राष्ट्रीय महामार्ग खरवंडी कासार या गावातून जात असून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. दुष्काळात राष्ट्रीय महामार्ग रसत्याचे काम सुरु असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. याच्या झळा जनतेसह सार्वजनीक बांधकाम विभागालाही अपुर्‍या पाणीसाठ्यामुळे बसत आहे.
खरवंडी कासार, भालगाव, येळंब, बीड असा रस्ता जोडण्यात येणार असून वाहतुकीच्या व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा महामार्ग आहे. परंतू नजीकच्या काळात या रस्त्यावर पाणी न मारल्यामुळे रस्त्याच्या कडेने वास्तव्यास असलेले कुटुंब व रसत्यावरुन वाहतुक करणार्‍या व्यक्तीना पादचारी व्यक्तींना धुळीचा प्रचंड ञास होत असून यामुळे नागरीक ञस्त झाले आहेत. गुलशन इन्फोटेक कंपनीने या महामार्गाचे कंत्राट घेतले असून मोठ्या प्रमाणात खडी रस्त्यावर पसरवली आहे. खरवंडी व मालेवाडी दरम्यान पुलाचे काम सुरु असून बांधकामावर कधी पाणी मारले जाते. तर कधी नाही. रस्त्यावर दिवसातून दर तीन तासाला पाणी मारुन धुळ उडणार नाही. याची खबरदारी घ्यायची असताना दर दोन दिवसातून एकदा पाणी मारले जाते. याचाच अर्थ असा की, मग कोट्यावधी रुपये खर्च करुन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. तर मग निष्काळजीपणा का केला जात आहे. खडीमधे मोठ्या प्रमाणात माती काललेली असल्याने कामाच्या पारदर्कतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. अशंतहा नागरीक धुळीमुळे होणार्‍या त्रासाला कंटाळले असून किमान रोज पुल बांधकाम व रसत्यावर पाणी मारण्याची मागणी नागरीक करत आहेत.