Breaking News

अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदेत थाळीनाद


अहमदनगर (प्रतिनिधी) : अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने थाळीनाद आंदोलन करुन जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाने जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून निघाला.

या आंदोलनात संघटनेच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ, शांता गोरे, सुरेखा विखे, सुनीता कुलकर्णी, विजया घोडके, शोभा तरोटे, मंगळ ढगे, शोभा लोकरे, छाया शिंदे, फुंदेताई, मंगल साखरे, कौशल्या झाडे, राजू लोखंडे आदींसह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा मिळावा, इतर राज्यांप्रमाणे अंगणवाडी सेविकांना मानधन द्यावे, सेवासमाप्ती लाभामध्ये तिपटीने वाढ करुन, त्यांना दरमहा पेन्शन लागू करावी, मिनी अंगणवाडीचे रुपांतर मोठ्या अंगणवाडीमध्ये करावे, अंगणवाडी केंद्रांना रजिस्टर्स व अहवाल फॉर्म द्यावे, अतिरिक्त चार्जच्या पैशात वाढ करावी, आदी अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी थाळीनाद आंदोलन करण्यात आले.