तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळया झाडून हत्या

गोळया झाडून हत्या साठी इमेज परिणाम

कोलकाता : पश्‍चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. सत्यजीत बिश्‍वास असे हत्या झालेल्या आमदाराचे नाव आहे. शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली.
याप्रकरणी भाजपाचे नेते मुकुल रॉय यांच्यासह चार जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चारपैकी दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय हंसखली पोलीस स्थानकाचे ठाणेदार यांचंही निलंबन करण्यात आलं आहे.
सत्यजीत बिश्‍वास हे कृशनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. बिश्‍वास हे फुलबाडी परिसरात आयोजित सरस्वती पुजेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. पुजा सुरू असतानाच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची माहिती आहे. त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी सांगितले. सत्यजीत यांची हत्या भाजपच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. सत्यजीत यांच्या हत्येमागे भाजपच्या मुकूल रॉय यांचा हात असल्याचा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला आहे. तृणमूलमधील काही विश्‍वासघातकी लोकांनी भाजपच्या या कामासाठी मदत केल्याचा आरोपही तृणमूल काँग्रेसने ट्विटवरून केला आहे. सत्यजीत बिश्‍वास हे फुलबाडी परिसरात एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम सुरु असतानाच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हल्यानंतर त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget