Breaking News

शिवजयंतीनिमित्त शंभुराजे कुस्ती संकुलाचा उद्घाटन सोहळा प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार


जामखेड ता.प्रतिनीधी समीर शेख
कुस्ती प्रेमापोटी स्वतः पदरमोड करून पस्तीस लाख रुपये खर्च करून भव्य कुस्ती संकुल उभारले आहे. या शंभुराजे कुस्ती संकुलाचा उद्घाटन सोहळा व भव्य हगाम्याने आयोजन शिवजयंतीनिमित्त ठेवण्यात आले आहे. याचे उद्घाटन नगर जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सकल मराठा समाजाचे तालुका समन्वयक मंगेश आजबे यांनी केले आहे.

शिवजयंतीचे औचित्य साधून जमादारवाडी रोड जामखेड येथे भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार आहे. शहरातुन शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची ढोल, ताशा व लेझीम पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. नंतर कुस्त्यांचा हगामा रंगणार आहे. यात प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकणाऱ्या मल्लास १५१००० ( एक लाख एकावन्न हजार रुपये रोख) व चांदीची गदा मिळणार आहे ही कुस्ती पै. विलास डोईफोडे विरुद्ध साईनाथ रानवडे यांच्यात होणार आहे. दुसरी कुस्तीसाठी १११००० रुपये रोख ही कुस्ती माऊली कोकाटे विरुद्ध सागर मोहळकर यांच्यात रंगणार आहे. हनुमंत पुरी विरुद्ध शिवाजी पवार, रवी करे विरुद्ध कुमार शेलार, अनिल ब्राम्हणे विरुद्ध भरत कराड, विजय मोडवे विरुद्ध योगेश शेळके, केवळ भिंगार विरुद्ध सिद्धनाथ ओमने, बापू जरे विरूद्ध विकास भागवत, अमोल मुंढे विरुद्ध सागर मोटे, श्रीराम बेडके विरुद्ध लहू ढाकवाले अशा एकूण ७५ कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत. 

या कार्यक्रमासाठी उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशिद, युवराज काशिद, रमेश आजबे, हिंदूराज मुळे, सुंदरदास बिरंगळ, सचिन गायवळ, राष्टकुल सुवर्ण पदक विजेता राहुल आवारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूदर्शन मुंडे, जामखेड चे तहसिलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, सुधीर शिंदे, सुहास जगताप, संजीव भोर, रमेश गुगळे, सा.बा. चे लियाकत काझी यांच्या सह अनेक मान्यवर कुस्ती शौकीन उपस्थित राहणार आहेत. कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने पंढरपूर व धनंजय खवळे राहणार आहेत कुस्ती सोडविली जाणार नाही व पंचाचा निर्णय अंतिम राहिल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

परिसरात कुस्तीचे वातावरण टिकून राहण्यासाठी भव्य शंभुराजे कुस्ती संकुल उभारण्यात आले आहे. यात शंभर मल्ल राहू शकतील व कुस्तीचे प्रशिक्षण घेतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मल्लांसाठी प्रशिक्षकाची सोयही करण्यात आली आहे. कुस्ती संकुलामुळे परिसरातील मल्लांसाठी खास सोय झाली आहे. शरीर संपदेशाठी याचा चांगला उपयोग होऊन चांगले मल्ल घडविण्यासाठीच होईल असे सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे यांनी सांगितले.