Breaking News

मनसे पदाधिकार्‍यांचा हिरमोड


Image result for manase

कराड (प्रतिनिधी) : मुंबईहून कणकवलीला आपल्या वैयक्तिक नियोजीत दौर्‍यानिमित्त शनिवारी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कराडला न थांबल्याने त्यांच्या स्वागतासाठी महामार्गावर तीन तास थांबलेल्या मनसे पदाधिकार्‍यांचा हिरमोड झाला.आपल्या वैयक्तिक नियोजीत दौर्‍यानिमित्त शनिवारी मनसेचे नेत राज ठाकरे हे कुटुंबियांसह मुंबईहून कणकवलीला जाणार असल्याची माहिती कराड व पाटण तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांना समजताच राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी महामार्गावरील पंकज हॉटेलसमोर पदाधिकार्यांनी शनिवारी एकच गर्दी केली होती. सायंकाळी सहा वाजण्याचे सुमारास साहेबांची गाडी बंदोबस्तात महामार्गावर आली. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अनेक मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र याठिकाणी गाड्या न थांबताच भरकन निघून गेल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.