Breaking News

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जिल्हा केंद्रावर राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-2019 दिनांक 17 फेब्रुवारीला सकाळी 10 ते दुपारी 12.00 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 अशा दोन सत्रात शहरातील 57 उपकेंद्रावर राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 2019 घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या कालावधीत दि.17 फेब्रुवारीला उपकेंद्राच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये व कायदा, सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 (3) अन्वये आदेश जारी करण्यात आले आहे.


या परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये या दृष्टीने परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणलाही बेकायदेशीररित्या प्रवेश करता येऊ नये व परीक्षेच्या संबंधाने असलेले परीक्षार्थी अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस प्रतिबंध होण्यासाठी तसेच परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी राज्य सेवा परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 या कालावधीत सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 (3) अन्वये आदेश जारी केला आहे, असे उपविभागीय दंडाधिकारी ( नगर भाग) उज्ज्वला गाडेकर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.