Breaking News

भारतीय वायुदलाच्या कारवाईचा शेगावमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष


शेगाव : भारतीय वायुदलाच्या कारवाईचा शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांकडून स्थानिक छत्रपती शिवाजी चौकात जल्लोष करण्यात आला. या वेळी छत्रपतींच्या पुतळ्याला हारार्पण करून फटाके फोडण्यात आले. तसेच ढोलताशांच्या गजरात भारत माता की जय, वंदे मातरम्, जय भवानी जय शिवराय, पाकिस्तान मुर्दाबाद अशी गगनभेदी घोषणाबाजी देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

 या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, भाजप नेते पांडुरंग बुच, माजी नगरसेवक अविनाश दळवी, उपजिल्हाप्रमुख संतोष लिप्ते, तालुकाप्रमुख रमेश पाटील, शहरप्रमुख संतोष घाटोळ, भाजप शहरप्रमुख डॉ.मोहन बानोले, युवासेना शहरप्रमुख शिवा कराळे, अमोल चव्हाणसह शिवसैनिक उपस्थित होते.