Breaking News

वायुसेनेच्या कामगिरीबद्दल कर्जतला फटाके फोडून जल्लोष


कर्जत/प्रतिनिधी: भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्याची बातमी समजताच कर्जत व्यापारी मित्र मंडळाच्यावतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. शहराच्या विविध भागातील व्यापार्‍यांनी एकत्र येऊन बाजारतळ येथे हा जल्लोष केला.

 यावेळी उपस्थितांनी भारत माता की जय, भारतीय वायुसेनेचा विजय असो, पाकिस्तान मुर्दाबाद आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या जल्लोषात राम ढेरे, मंगेश कदम, अंकुश थोरात, बिट्टू कानडे, दिलीप भोज, यश बोरा, संतोष परदेशी, बंडाकाका तोरडमल, पांडुरंग जठार, शाहिद झारेकरी, राजू भोगे, सागर बलदोटा, रोहिदास माने, तेजस कानडे, तुषार कानडे, सचिन थोरात यांच्यासह अनेक व्यापारी सहभागी झाले.