Breaking News

यशवंतनगर येथे पथदिप उर्जीकरणचा लोकार्पण सोहळा उत्साहात


मसूर (प्रतिनिधी) : यशवंतनगर, ता. कराड येथे आ. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 मधून 18.30 लाख रूपये खर्चाच्या पथदिप उर्जीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, जि. प. सदस्य मानसिंगराव जगदाळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चेतनकुमार कुंभार, उंब्रज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

आ. बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सह्याद्रि कारखान्याची स्थापना केली व त्याची संपूर्ण जबाबदारी स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्यावरती सोपवली. पी. डी.पाटीलसाहेब यांनीही ती जबाबदारी समर्थपणे सांभाळून, सर्वांना बरोबर घेवून समान न्याय देणेसाठी सातत्याने प्रयत्न केले.

सह्याद्रिच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावणेसाठी प्रयत्न केले. मात्र, 2015 मध्ये महावितरणने केलेल्या शेती पंपांच्या विजदरवाढीमुळे सहकारी पाणी पुरवठा संस्थांसह शेती पंपधारकांपुढे मोठे संकट उभे राहिले होते. ही वीज दरवाढ शेतकर्‍यांना परवडणारी नव्हती. या विरोधात सातत्याने महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करण्यात आली, अलिकडेच कोल्हापूर येथे रास्ता रोको केला या लढ्यास यश मिळून वीजदरवाढ रद्द करून शासनाने रू. 1.16 पैसे प्रति युनिटप्रमाणे जानेवारी 2019 पासून आकारणी सुरू करण्याची कार्यवाही केली आहे, त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुनील माने म्हणाले, केंद्र व राज्य सरकारकडून मोठ-मोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र निकष फार कठीण असल्यामुळे सामान्यांच्या हाती काही मिळत नाही. तसेच जुने मुद्दे काढून भावनिक राजकारण केले जाते. आघाडी शासनाच्या काळात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारसाहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शेतकर्‍यांना व सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. काळात सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. रत्नाकर तांबे यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक कांतीलाल पाटील, अशोकराव पाटील, जयवंतराव जाधव-पाटील, संजय जगदाळे, माणिकराव पाटील, पांडुरंग पाटील, पै.संजय थोरात, तानाजीराव जाधव, डी.बी.जाधव, अविनाश माने, भास्करराव गोरे, नंदकुमार माने, लहुराज जाधव, संजय कुंभार, संचालिका सौ.प्रांजली साळुंखे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, फायनान्सिअल अ‍ॅडव्हायझर एच. टी. देसाई, जनरल मॅनेजर पी. आर. यादव, चीफ अकौन्टंट जी. व्ही. पिसाळ, सिव्हील इंजिनिअर वाय.जे.खंडागळे, उदय पाटील, शेती अधिकारी मोहनराव पाटील, ऊस विकास अधिकारी, व्ही.बी.चव्हाण, कामगार व कल्याण अधिकारी निवासराव जाधव, जनसंपर्क अधिकारी विश्‍वासराव शेलार, इरिगेशन इंजिनिअर वामनराव साळुंखे, ई. डी.पी. मॅनेजर प्रकाश सोनवणे, पर्यावरण इंजिनिअर हेमंत माने, सुरक्षा अधिकारी एस. बी. नाईगडे, डे. सिव्हील इंजिनिअर पी. एस. चव्हाण, डिस्टीलरी इनचार्ज डी. जे. जाधव, चीफ केमिस्ट बी. एस. शिंदे, गोडावून किपर एस. बी. साळुंखे, यशवंतनगरचे लोकनियुक्त सरपंच तुळशीराम किसन चव्हाण, उपसरपंच सौ. लिना निवासराव जाधव, सदस्य प्रकाश शिवाजीराव सोनवणे, विकास रविंद्र चव्हाण, रघुनाथ विष्णू येडगे, हणमंत गोपाळ काळेबाग, अनिल दौलत यादव, सदस्या सौ. सौ.संजिवनी बाळासाो माळवे, सौ. विरश्री गणपती करांडे, सौ. अरूणा शशिकांत देशमुख, सौ. दीपाली पांडुरंग स्वामी, मानसिंगराव चव्हाण माणिकराव थोरात, प्रविण थोरात, दिनेश डोंगरे, महावितरणचे शाखा प्रमुख देशमुख या कामाचे ठेकेदार शिवाजीराव साळुंखे यांचेसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.