Breaking News

युवकांनी उद्योगधंद्यामध्ये उतरण्याची गरज -आ.मेटेचापडगाव/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील युवकांनी केवळ शेती व्यवसायावर अवलंबून न राहता उद्योगधंद्यामध्ये उतरण्याची गरज शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी प्रतिपादन केले. ते शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे आयोजित युवकांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत लोहकरे हे होते. यावेळी बोलताना आ. मेटे यांनी शेतकर्‍यांना शासनाने प्रति महिना तीन हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी केली. वारंवार पडणार्‍या दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने महाराष्ट्रामध्ये नदीजोड प्रकल्प राबविण्याची मागणी आमदार मेटे यांनी केली.
यावेळी शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ ईसर, वाडे गोकुळ, मडके अशोक, पाचकळ प्रदीप, काळे सुरेश, मुंदडा बाळासाहेब, मुंदडा लक्ष्मण, ईसर वादे, पंडित उभेदळ, धर्मराज आहेर, कृष्णा नेमाने, तुळशीराम मडके, अनिल जगदाळे, नारायण गायके आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. मेटे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सध्या भीषण दुष्काळ असून शिवसंग्राम पक्षातर्फे अनेक ठिकाणी शेतकर्‍यांच्या जनावरांसाठी चारा मिळावा म्हणून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. यावेळी आमदार मेटे यांच्या हस्ते नरवाडे, ईसर वादे यांच्या हॉटेल शिवनेरीचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन समारंभास जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलासराव नेमाने उपस्थित होते.