Breaking News

ज्ञानेश्‍वर माऊली, तुकारामच्या गजरात वडूजचा रथोत्सव


वडूज (प्रतिनिधी) : वडूज शहर व परिसरासह तालुक्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असणार्‍या श्री सिद्धिविनायक रथोत्सव ज्ञानेश्‍वर माऊली, तुकारामांच्या जयघोषात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील भजन, कीर्तन, प्रवचन या कार्यक्रमामुळे सम्पूर्ण शहर भक्तिमय झाले होते. सकाळी नऊच्या सुमारास विजय शिंदे यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर ह. भ.प.जयंत कुलकर्णी यांचे गणेश जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर पुष्पवृष्टी झाल्यानंतर रथोत्सवास सुरवात झाली .चौकाचौकात दहीहंडी फोडण्यात आली तसेच रांगोळी, स्वागत कमानी उभारून स्वागत करण्यात आले. रथासमोर बॅड, बैंजो,शालेय विद्यार्थी लेझिम आदींची प्रात्यक्षिक झाली. तालुक्यातील विविध दिंड्या सहभागी झाल्या होत्या.भाविक भक्तांसाठी शहरातील अनेक मंडळाने चहा,सरबत, लस्सी, अल्पोपहाराची सोय केली होती.
यानिमित्ताने परिसरातील शेकडो भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त खेळणी,पाळणे,मेवा,मिठाईची दुकाने मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. दुपारी एक वाजल्यापासून प्रकाश व दिलीप लक्ष्मण माळी यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत श्रीृ ची मिरवणूक सुरु होती. तसेच महाप्रसादाचे वाटप सुरू होते.