Breaking News

रांजणगाव गणपती शाळेतील चार शिक्षकांना द बेस्ट टिचर अवार्ड


शिरुर/प्रतिनिधी
श्री मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती शाळेतील प्रशांत पवार या शिक्षकासह चार शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल जमीयुतूल मुस्लेमिन माहिम, मुंबई सेक्युलर एज्युकेशन सोसायटी व वूमन वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने 7 वे राष्ट्रीय संमेलन व शिक्षक पुरस्कार या आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द बेस्ट टिचर अवार्ड या पुरस्काराने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील श्री मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती शाळेतील प्रशांत पवार, संजय गणपत कर्डीले, सुधीर शंकर गायकवाड, सागर रघुनाथ कोकाटे, युनुस इस्माइल तांबोळी या शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल जमीयुतूल मुस्लेमिन माहिम, मुंबई येथे सेक्युलर एज्युकेशन सोसायटी व वूमन वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने 7 वे राष्ट्रीय संमेलन व शिक्षक पुरस्कार या आयोजित कार्यक्रमात मुंबई येथील जमीयुतूल मुस्लेमिन माहिमचे जनरल सेक्रेटरी मन्सुरअली, औरंगाबाद येथील लोकसेवा कॉलेजचे प्राचार्य डॉ.शहाबुद्दीन शेख आदींसह उपस्थितांच्या हस्ते प्रशांत पवार यांना सन्मानचिन्ह देऊन द बेस्ट टिचर अवार्ड या पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच शिरूर शिक्षण प्रसारक मंडाळचे अध्यक्ष सुकुमारजी बोरा, उपाध्यक्ष चंद्रकांत बाफणा, सचिव तु.म.परदेशी, श्री मंगलमुर्ती विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक सुभाष वेता, पर्यवेक्षक फंड, रा.नि.शेख, चव्हाण, माजी नगरसेवक निलेश लटांबळे, आदीसह ग्रामस्थांनी या शिक्षकांचे कौतुक केले.