Breaking News

पुलवाम्यातील शहीद जवानांना मंत्रिमंडळाकडून श्रद्धांजली
मुंबई, - काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हल्ल्यामागील सूत्रधार असणाऱ्या पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. 

या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश असून या जवानांच्या कुटुंबियांना शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या धोरणानुसार 50 लाखांची मदत दिली आहे. तसेच जवानांच्या कुटुंबियांना जमीन देण्यासह कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.