Breaking News

विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणार्‍यावर गुन्हा दाखल


कराड (प्रतिनिधी) : शाळेत शिकत असणार्‍या मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पिडीत मुलीने कराड शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नवनाथ धोंडीराम झोरे असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलीचे आई-वडील कामावर गेले असताना पिडीत मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून नवनाथ तिच्या खोलीत आला व तुझ्या आईला मी बरेच वेळा सांगितले आहे की, माझे तुझ्याशी लग्न लावून दे. पण तुझी आई ऐकत नाही. आता तुला बघतो असे म्हणून वाईट उद्देशाने पिडीत मुलीला जबरदस्तीने ओढत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पिडीत मुलीला बाहेर असलेल्या तिच्या काकांचा आवाज आल्याने मुलीने जोरात काका असा आवाज दिला. त्यानंतर काकांनी येऊन दरवाजा वाजवल्यानंतर नवनाथने दरवाजा उघडून पळून गेला. याबाबत पिडीत मुलीने शहर पोलिसात फिर्याद दिली असून नवनाथ झोरे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जौंजाळ करीत आहेत.