Breaking News

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गोपाल पांढरे सन्मानित


धाड,(प्रतिनिधी): येथील ज्ञानदेवराव बापू दांडगे ज्ञानमंदिर व ज्युनिअर  कॉलेज येथे  सहशिक्षक या पदावर कार्यरत असलेले शिक्षक गोपाल नारायण  पांढरे यांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते नुकतच  राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  शनिवारी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने राज्यस्तरीय  आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा सरस्वती भुवन प्रशाला औरंगाबादच्या मैदानात  अगदी उत्साहात संपन्न झाला.

 शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात  उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात  येते. दरम्यान गोपाल पांढरे यांचे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य असून  विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ते नेहमीच कृतिशील असतात.वेळोवेळी  उपयुक्त उपक्रम घेणे, विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी  यासाठी प्रकल्प राबविणे, गणित विषयामध्ये विद्यार्थ्यांना स्वनिर्मित  शैक्षणिक साहित्याच्या आधारे अध्यापन करणे. विद्यार्थ्यांना सर्वच  क्षेत्रांचे परिपूर्ण ज्ञान व्हावे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.  पांढरे यांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन  सन्मानित करण्यात आले. याबरोबरच गोपाल पांढरे यांचे शैक्षणिक कार्य  उत्कृष्ट आहे,हे मात्र परिसरात परिचित आहेच. गोपाल पांढरे यांच्या या  सन्मानाने दांडगे स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.या  कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रवक्ते मा.शिरीष  बोराळकर,मराठवाडा वैधानिक मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, माजी आमदार  गोविंद केंद्रे, दयानंदगिरी महाराज महामंडलेशवर, शिक्षक समितीचे संस्थापक  अध्यक्ष दिलीपजी ढाकणे, राज्याध्यक्ष अंकुशजी काळे, राज्य सरचिटणीस  माधवजी लातूर, शिक्षक नेते के.सी.गाडेकर, महिला राज्याध्यक्षा मुक्ता  पवार, राज्य सरचिटणीस सुष्मा राऊतमारे, माध्यमिकचे राज्याध्यक्ष महेशजी  तांदळे, राज्य उपाध्यक्ष गिरीश नाईकड,खाजगी संस्था जिल्हाध्यक्ष छोटू  पटेल यांबरोबर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

 यांच्या या यशाचे संस्थेचे  अध्यक्ष मा.श्री.मनोजभाऊ दांडगे सचिव उमेशभाऊ दांडगे, ट्रस्टी संतोषभाऊ  दांडगे आणि प्राचार्य  संतोष डवले यांबरोबर शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांच्यासह परिसरातील सर्वांनी पांढरे यांचे अभिनंदन करून  त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.