Breaking News

कृष्णामाई घाटावरील मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उत्साहात


कराड (प्रतिनिधी) : येथील कृष्णामाई घाटावरील कृष्णाबाई मंदिरात नवग्रह, ब्रह्मदेव आणि सरस्वती यांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापनेचा समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. करवीरपीठाचे सद्गुरू श्रीशंकराचार्य यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले.

तर जयराम स्वामींचे वडगाव येथील मठाधिपती श्रीविठ्ठल स्वामी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यातील सर्व विधी पार पाडल्यानंतर नवीन कृष्णाबाई मंगल कार्यालय येथे महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती. यावेळी कृष्णाबाई घाट ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब बुधकर, विश्‍वनाथ जोशी, विठ्ठलराव शिखरे, अमित बुधकर आदी मान्यवरांसह भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.