पुन्हा पंतप्रधान होण्याचा मोदी यांना विश्‍वास


नवीदिल्लीः पुढील दोन महिने आम्ही सगळेच निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त राहणार आहोत. मी स्वत:ही या निवडणुकीत एक उमेदवार असणार आहे. त्यामुळे पुढची ‘मन की बात’ मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी असेल, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा तेच पुढचे पंतप्रधान असतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी ‘मन की बात’च्या सुरुवातीलाच पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. आजची ‘मन की बात’ विशेष असणार आहे. हा कार्यक्रम चुकवू नका, अशा प्रकारचे ट्विट पंतप्रधानांनी केल्याने ते काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. जनतेशी संवाद साधताना ते म्हणाले, की आपले सशस्त्र दल नेहमीच शौर्य गाजवत आले आहे. शांतता प्रस्थापित करण्याचे काम असो वा हल्लेखोरांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यायचे; आपले जवान सदैव सेवशी तत्पर राहिले आहेत. आपल्या लष्कराने आता दहशतवाद आणि त्यांना मदत करणार्‍यांचा नायनाट करण्याचा संकल्प केलेला आहे, असे नमूद करत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा मोठ्या कारवाईचे संकेत दिले.
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या भावनांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्यांच्या देशभक्तीला सलाम केला. विजय सोरेंग या जवानाचे पार्थिव जेव्हा गुमला येथे पोहोचले, तेव्हा त्याच्या निरागस मुलाने मीही लष्करात जाणार, अशा भावना व्यक्त केल्या. भागलपूरमधील हुतात्मा रतन ठाकूर यांच्या वडिलांनीही देशभक्तीचा बाणा दाखवला. अशाचप्रकारे प्रत्येक हुतात्मा जवानाच्या घरातून देशभक्तीचे जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येत असून हेच आपल्या देशाचे बलस्थान असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget