Breaking News

निलेश खाबीया यांना अज्ञात इसमाकंडून मारहाण


पाथर्डी/प्रतिनिधी
शहरातली निलेश खाबीया हे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपल्या खाजगी शिकवणीचे तास घेऊन शेवगाव रोडवरील चोरडिया कॉम्प्लेक्स समोरून घरी जाण्यासाठी निघत असताना अज्ञात इसमानी लाथाबुक्यांनी मारहाण करून मोटरसायकलवर बसून पसार झाले आहेत.

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, निलेश खाबिया हे शेवगाव रोडवरील चोरडिया कॉप्लेक्स मध्ये सातवी, आठवी, नववी या वर्गाचे इंग्रजी विषयाची शिकवणी घेत असून शुक्रवारी नेहमीप्रमाणे त्यांनी आठवी वर्गाची शिकवणी घेऊन घरी जाण्यासाठी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघत असताना दोन इसमानी जवळ येऊन काही न बोलता खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर ते 4270 नंबरची लाल रंगाच्या पल्सर व नंबर नसलेली बुलेट गाडीवर बसून चार इसम पसार झाले आहेत. सदर मारहाणीत निलेश खाबिया यांना तोंडाला, पायाला, हाताला मार लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते.