Breaking News

श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानचे पुण्यामध्ये आज उद्घाटन


फलटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानचा उद्घाटन समारंभ रविवार, दि. 10 रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथे मोठ्या दिमाखात होणार आहे.हा कार्यक्रम पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, सौ. राजलक्ष्मी भोसले, सारंग पाटील, संजोग वाघेरे- पाटील, विठ्ठल काटे यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी फलटण बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणच्या नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर, सत्यजितराजे नाईक निंबाळकर,अजयसिंहराजे नाईक निंबाळकर, फलटणच्या नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, सभापती सौ. प्रतिभा धुभाळ, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम पुणे येथील अलका टॉकीजजवळील पत्रकार भवनात होणार असून या वेळी उपस्थित राहाण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.