Breaking News

क्रीडा शिक्षकांचे राज्यस्तरीय महाअधिवेशन उत्साहात


प्रवरानगर/प्रतिनिधी

शिर्डी येथे आयोजित शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या राज्यस्तरीय महाधिवेशन मोठ्या उतसात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा उपसंचालक सुहास पाटील उपस्थित होते. या अधिवेशनात क्रीडा शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी ११ ठराव मांडण्यात आले. तात्पुरती सकाळच्या सत्रात महेश देशपांडे, मेजर कुलथे, ज्ञानेश काळे, राजेंद्र बनसोडे यांच्या ‘शालेय क्रीडा स्पर्धा मार्गदर्शन’ या विषयावर प्रकट मुलाखती झाल्या.

समारोप प्रसंगी बोलताना शिक्षण संचालक गंगाराम म्हमाणे म्हणाले कि सर्व खेळाडूंना मान-सन्मान मिळत असून, आर्थिक पाठबळही मिळत आहे. परंतु क्रीडा शिक्षक वेगवेगळ्या कारणांमुळे दुर्लक्षित राहिला आहे. यानंतर कोणत्याही शारीरिक शिक्षकाला धक्का पोहचणार नाही व सरप्लस होणार नाहीत , क्रीडा शिक्षकांना संच मान्यतेत सामावून घेऊ.

या वेळी व्यासपीठावर आप्पासाहेब शिंदे, डॉ. संध्या जिंतूरकर, चंद्रकांत पाटील, सुवर्णा घोलप, राजेश जाधव, प्रतिभा डबीर, संजय पाटील, नीलेश इंगळे, राजेंद्र जगदाळे, महेंद्र हिंगे, राजेंद्र पवार, आनंद पवार, गणेश म्हस्के उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी होण्यासाठी सुनील गागरे, नंदकुमार शितोळे सोपानराव लांडे,भाऊसाहेब बेंद्रे ,हनुमंत गिरी,ज्ञानेश्वर रसाळ,सुनील आहेर,किरण हिंगेकर,बाळासाहेब कोतकर, प्रशांत होन,शिरीष टेकाडे आदी क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन राजेंद्र कोहोकडे यांनी तर आभार ज्ञानेश काळे यांनी मानले.